Posts

जिद्द ज्याच्या ठायी सिद्धी त्याच्या आयुष्यी

जिद्द अंगभूत असेल तर कोणतेही काम अशक्य नाही ज्याला पाय नाही त्याला विचारूया जिद्दीने कसे चालावे कसे पळावे यशाचा एव्हरेस्ट  वर कसे उभा राहावे ज्याला हात नाही त्याला विचारूया काम कसे जिद्दीने करावे जेसिका कॉक्स ला विचारूया तुझ्या हाताची किंमत काय जिने हात नसताना आज गगनात भरारी घेतली एक वैमानिक बनुन न उलगडणारे प्रश्नाचे उत्तर फक्त   जिद्दच सोडू शकते आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याची आसं होती म्हणून तर आज जिद्दीने मिळवलेल्या स्वराज्यामध्ये आपण आनंदात डोलतोय जगाला नाविन्य दाखवण्यासाठी जिद्द या दोनच अक्षरांवर नऊ महिने अंतराळात राहून सुखरूप या पृथ्वीवर भक्कम पाय टेकवणाऱ्या आपल्या सुनीता विल्यम्स  सलाम त्या जिद्दीला काडी काडी तोंडात धरून सुंदर असा खोपा बनवते ती जिद्दीनेच छोटीशी सुगरण काडी सारख्या शेंड्याला तग धरून ठेवते कैरी  आणि सांगते माणसा माझ्याकडे बघा जिद्द ठेवा

Hatakeshwar

Image
Hatkeshwar